.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

लहर की बरखा

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित "लहर की बरखा"


मंगल नाम तुम्हार प्रभू ! जो गावे मंगल होत सदा ।

 अमंगलहारि कृपा तुम्हारी,जो चाहत दिलको धोत सदा।।

 तुम आद अनाद सुमंगल हो, अरु रुप तुम्हार निरामय है।

तुकड्या कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है।।

(हरिगीत-छंद)

मंगल स्वरुप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है।

तुम्हरी कृपा मंगल करे-ऐसा रहे अभ्यास है।।

यहि चाहते मंगलकरण ! नित ख्याल हमको दीजिये।

 हे सद्गुरो! हम बालकोंपर, नैन-बरखा कीजिये।।

मेरे परम  आनंदघन, कैवल्यदानी हो तुम्ही।

 तुम बीन शांती ना हमें, दिलकी निशानी हो तुम्ही ॥

बस, जन्मका साफल्य है, तेरे दरस दीदारसे।

 चाहे गुरु के चरण जो, सो ही तरे भव -धारसे।।

प्रभू! मानव-जन्म दिया हमको,

पर बुद्धि रही पशुओंके समाना।

नहिं ज्ञान कबहुँ सपनेहुँ मिले,

नितपावत देहनको अभिमाना।।

मुफ्त गई जिंदगी हमरी,

धनलोभ सदा विषयों मनमाना ।

अबतो कर ख्याल कछू हमपे,

नहिं तो कल देश मिलाय बिराना।।

दुर्गुणके है पात्र हम, तुमसे नहीं प्रभु ! छीपता।

पर भी तुम्हारी है दया, देदी हमें बुद्धीमता ।।

 उपयोग हम करना सदा, ऐसी तुम्हारी भाक है।

 पर जीव - हम विषयी बने, मालुम नहीं क्या झाँक है।।

 

दरबारमें स्वामी ! तुम्हारे, क्या नहीं ? सब है भरा ।

 धर्मार्थ कामरु मोक्ष है, जो चाहते करते पुरा ।।

पर लाज हमको आ रही, किस हाथसे माँगे तुम्हें ।

 नहिं याद भी तुमरी करी, नित झूठके संगमें गमे ।

 

 प्रभू ! हो हमारे पासमें, नहिं जानते तुमको हमी।

 गर जानते थे आपको, किस बातकी रहती कमी ?

 हमतो भुले है झठसे, माया जाती , माया-नटीके ढंगमें।

 करके भिखारी हो गये, अब ख्याल होता है हमें।।

मोटे भये अभिमानसे, पर ध्यान तो सब नीच है।

 नहि शांतता पल भी रहे, भूले विषयके बीच हैं।।

ऐसे अधम के नावको, प्रभु! किस जगह रखवायेंगे?

 तारो नहीं जलदी कभी, हमरी सजा हम पायेंगे ।।

पुरी फजीती कर प्रभु ! तब याद तेरी आयगी।

 हम है बडे बैमान नहिं तो, खबर सब भुल जायगी ।।

 रख दुःखमें संसारके , तब तो पुकारेंगे तुझे ।

नहिं तो कठिन है मोह यह, नहिं याद आती है मुझे ।।

१०

विन कष्ट हो संसारमें, ईश्वर भजन आता नहीं।

 प्रभु ! कष्ट दे दो मुझे, दिल तब तलक छाता नहीं।।

मैं खूब करता याद पर, प्रेमा नहीं पाता कभी।

 बैराग दे संसार से, फिर याद हो सच्ची तभी।।

 ११

हम आपके है पात्र, देना दंड तुम्हरा काम है।

 बिन दंड हो बुद्धी कभी, पाती नहीं आराम है।।

ऐसी सजा प्रभु ! दीजिये, जावे न सिद्धी-मोहमें।

बस नाम लेकर आपका, छीवू न फिरसे द्रोहमें ।।

 

१२

 नहिं मूढ मेरे-सा कहीं, तुमको मिलेगा आखरी ।

 सुख- भोग में हूँ चाहता, तुमसे कराता चाकरी ।।

 सिरपे हमारे पापका-बोझा कहाँ पर डालना ? |

बस, न्याय तो तेराहि यह, 'जिसका उन्हेंही सम्हालना'।।

१३

दिलसे प्रभो ! हम है दुखी, अब आपही खुद जानते ।

 यह दिल जरा ना मानता, चाहे तजो यह प्राणते ॥

करके सभी जपजापभी-सतसंगभी करते सदा ।

 लेकिन भुली है राह तो, दिल है वही वैसा गधा ।।

 

 



मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय २४ वा यात्रा-मेळे



अध्याय २४ वा

यात्रा-मेळे

 

श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न ।

 वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥

 

ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती ।

 आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥

 

त्यांचे फड निरनिराळे । साजविती भिन्न देवळें ।

 कोठे प्रतिमापूजेचे सोहळे । कोणी मूर्तिविरोधक ॥३॥

 

कित्येकांची तीर्थी धाव । ते इतरांसहि देती उठाव ।

 इकडे ओस पडलें गांव । तरी पर्वा नाही ॥४॥

 

या सर्वांचीं मतें वेगळीं । भिन्न त्यांची संतमंडळी ।

एकएकाची करितो टवाळी । आपाआपुल्या गोटांत ॥५॥

 

वेगवेगळया शिष्यशाखा । वेगवेगळे गुरु देखा ।

 कोणी न मिळती एक-एका । करिती उत्सव आपुले ॥६॥

 

खरें-खोटें ज्ञान कांही । अंधरूढया शिकविती पाही ।

गट पडले भिन्न भाविकांचेहि । मिरविती द्वाही आपुलाली ॥७॥

 

हे जोंवरी एक न होती । तोंवरी संघटनेची फजीती ।

 यासि उपाय करावा कोणेरीतीं । तेंचि आम्हां सांगावें ॥८॥

 

श्रोतयांचा प्रश्न मार्मिक । उत्तर ऐका आवश्यक ।

गांवापासोनि विश्वापर्यंत देख । जरूरी याची ॥९॥

 

भिन्न भिन्न झाले गट । वेगवेगळे पडले तट ।

 आकुंचित मतें शिकविती रोगट । समाजासि ॥१०॥

 

अंधश्रध्देस आणोनि पूर । लोकीं रुजविती मिथ्याचार ।

 त्यांच्या उत्सवांचे प्रकार । विचित्रचि असती ॥११॥

 

अपार धनाची धुळधाणी । अनिष्ट प्रथांची पेरणी ।

फुटीर वृत्ति वाढेल जनीं । ऐसी करणी कितीकांची ॥१२॥

 

कित्येक बुवा वेषधारी । जगती ऐशा गटांवरि ।

खरें ज्ञान न देती स्वार्थभरीं । जनतेलागी ॥१३॥

 

ऐसें हें जोंवरि चाले । तोंवरि गांव भ्रमीं बुडालें ।

सुधारणेच्या मार्गी आले । दरी-दरकुटे ॥१४॥

 

यासाठी एकचि उपाय । आपण न ठेवावे अलग ठाय ।

 त्यांच्यांत जावें मिळोनि निर्भय । समुदाय साधाया ॥१५॥

 

असो कोणाचा कोणता पंथ । असो कोणीहि बुवा महंत ।

 सर्वा आपुलेचि मानोनि सतत । जावें मिळोनि सर्वांशीं ॥१६॥

 

पंच महोत्सवचि आपुले । येर ते तुच्छ मानतां चुकलें ।

 आपण अलग पडतां कसलें । साधेल ऐक्य ॥१७॥

 

म्हणोनि निर्वाळा सांगतो । जेव्हा संतजयंति पुण्यदिन येतो ।

तेव्हा सगळयांमिळोनि करावा तो । सार्वजनिक स्थानीं ॥१८॥

 

मग तो असो कोण्या पंथाचा । वेगळी न ठेवावी वाचा ।

संतसज्जन सखा विश्वाचा । म्हणोनिया ॥१९॥

 

सर्व पंथांचे उत्सव । ज्यांत दिसेल सत्यगौरव ।

 त्यांतूनि विशालतेचे भाव । भरावे लोकीं ॥२०॥

 

एकलकोंडे राहूं नये । घरींच उत्सव करूं नये ।

 सर्वांचें सहकार्य घ्यावें । हेंचि मर्म संघटनेचें ॥२१॥

 

उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम ।

 थोरांचें भाषण भजन उत्तम । करावें तेथे ॥२२॥

 

करितां संतांचा गुणगौरव । सांगूं नये चमत्कारलाघव ।

 पाडवा उत्तम वागणुकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥

 

संत ज्ञानेश्वरतुकाराम । नामदेवसांवताचोखा अनुपम ।

एकनाथदामाजी भागवतोत्तम । वर्णावे लोकीं ॥२४॥

 

सजन कसाईरविदास चांभार । सेनासंताजीगोराकुंभार ।

 कृष्णदयार्णववामनश्रीधर । संतकवीहि ॥२५॥

 

रामदासतुलसीदास । केशवदासकबीरदास ।

 सुंदरदासविष्णुदास । सूरदासादि ॥२६॥

 

शंकराचार्यरामानुजाचार्य । मध्वाचार्यवल्लाभाचार्य ।

 राधास्वामीबसवाचार्य । रमणमहर्षिश्रीचक्रधर ॥२७॥

 

शहादत्तगोरखनाथ । गोविंदनाथदयाळनाथ ।

 नरसी मेहतारामतीर्थ । श्रीसमर्थ आडकोजी ॥२८॥

 

महात्मा मंसूरमहंमद । कवेंररामशेखफरीद ।

 झरतुष्ट्र आणि गौतमबुध्द । विवेकानंद प्रभावी ॥२९॥

 

गुरु गोविंदसिंहनानकदेव । महाचैतन्य गौरांगदेव ।

 रामकृष्ण परमहंसदेव । जैन महावीर स्वामी ॥३०॥

 

महात्मा येशुटालस्टाय । मार्क्ससाक्रेटीस निर्भय ।

महात्मागांधीराममोहनराय । दयानंदादि महाज्ञानी ॥३१॥

 

भक्त मीराबाईमुक्ताबाई । कान्होपात्राजनाबाई ।

 रंगनायकीबहिणाबाई । एनिबेझंटनिवेदिता ॥३२॥

 

ऐसे जे जे योग्य प्रभावें । त्यांचें चारित्र्य समजोनि द्यावें ।

त्यांनी समाजकार्या गौरवें । काय दाविलें जनतेसि ॥३३॥

 

ऐसियांची पुण्यतिथि आदि करावी । सर्वांची प्रार्थना घ्यावी ।

 उत्तम वक्त्यांनी चरित्रें बोलावीं । परिणाम होईल त्या शब्दीं ॥३४॥

 

त्यांची विशालता समजोनि द्यावी । समान भावना अनुसरवावी ।

 समाजानेहि तैशीच करावी । प्रगति आपुली म्हणोनि ॥३५॥

 

संत देहांनी भिन्न असती । परि ध्येयधोरणानें अभिन्न स्थिति ।

 साधनें जरी नाना दिसती । तरी सिध्दान्तमति सारिखी ॥३६॥

 

ऐसें सांगतां अभ्यासें वर्णूंन । भिन्न संप्रदायांचें होईल मिलन ।

 होईल बुवाबाजीचेंहि खंडन । सर्वतोपरीं ॥३७॥

 

नाहीतरि पंथांचे पडती गट । सहकार्याचा भंगे तट ।

 पोटभरू दांभिकांचे पोट । चालतसे तयावरि ॥३८॥

 

आपापल्या भाविक जना । भुलविती उत्सवादिकीं नाना ।

 अंधश्रध्देने होय धिंगाणा । ग्रामजीवनाचा ॥३९॥

 

म्हणोनि आणावे मैदानावरी । आकुंचितपण सारोनि दुरी ।

 मग सत्यचि बोलेल वैखरी । सर्वामुखीं मंगल ॥४०॥

 

गांवीं येवोत संत कोणी । बोध करवावा प्रार्थनीं ।

 अथवा सार्वजनिक स्थानीं । सर्वांसाठीं उत्सवादिकीं ॥४१॥

 

तेथे न सांगवेल भाकडकथा । न पाळवेल अनिष्टप्रथा ।

मार्ग लाभेल आइता । लोकां सत्य ज्ञानाचा ॥४२॥

 

ज्ञानाचिया भूमिकेवरि । फारशा भेदासि न उरे उरी ।

 मिळते जुळते बोल बहुपरी । निघती सर्वांचे ॥४३॥

 

तेणें निरसेल भेद-कल्पना । तात्त्विकताचि कळेल जना ।

पंथबाजीच्या उच्चाटना । उपाय हा अमोलिक ॥४४॥

 

जेथे लोक समभावनेने बैसले । तेथे यथार्थचि चर्चा चाले ।

 देव-संत-धर्म-ऐक्य साधे भलें । हळुहळू तेणें ॥४५॥

 

म्हणोनि ऐसे वारंवार । प्रसंग आणावे गांवीं सुंदर ।

 साधुसज्जन जुळवावे अपार । भिन्न भिन्न पंथांचे ॥४६॥

 

ऐक्य दृष्टीने संतोत्सव । करावे उत्साहें गांवोगांव ।

 जेणें तीर्थाचा गौरव । लाभेल गांवा ॥४७॥

 

तीर्थी निर्मल साधुवृंद । तेथे तत्त्वचिंतानुवाद ।

 जनास होईल तत्त्वबोध । म्हणूनीच महत्त्व तीर्थाचें ॥४८॥

 

एरव्ही ’ तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनीं ’ 

ऐसीच वदली संतवाणी । गर्जोनिया ॥४९॥

 

तैसें आज मार्गदर्शन । जया तीर्थी न होय पूर्ण ।

तेथे धाव घेवोनि कोण । लाभ या जना ॥५०॥

 

यात्रेस जावें तरि सेवेसाठी । विचारस्फूर्ति आणाया गांठीं ।

तेणें गांव करावें उठाउठीं । यात्रारूप आपुलें ॥५१॥

 

परंतु यात्रा करिती चारोधाम । लोकां मागती न करितां काम ।

 यांत न घडे पुण्यकर्म । वाउगा भ्रम अहंकार ॥५२॥

 

गांवीं उपाशी ठेवोनि बाळां । जावें कासया कुंभमेळां ?

 देव गांवीं थोडा तीर्थी निराळा । ऐसें नाही ॥५३॥

 

परि लोक सती पडाया जाती । पंडयादिकांच्यां जाळीं गुंतती ।

मेंढरापरी धांवोनि मरती । रूढीमागे ॥५४॥

 

पंढरीपासून सहा कोसांवरि । सांवता राहिला जन्मभरि ।

 देव मिळविला न करितां वारी । गांवींच त्याने ॥५५॥

 

जनता-जनार्दनाच्या सेवेचें । काम करितां इमानें साचें ।

 गांवींच पुण्य पंढरीचें । धांव घेंई आपैसें ॥५६॥

 

वसती जेथे ऐसे संत सेवक । तें गांवचि तीर्थ होय सुरेख ।

स्फूर्ति घेवोनि जाती लोक । कराया गांवें भूवैकुंठ ॥५७॥

 

जेथे प्रेम आणि पावित्र्य । त्यासीच नाम तीर्थक्षेत्र ।

 कासया जावें गोंधळ विचित्र । बघाया तीर्थी ॥५८॥

 

गांवाचें सार्वजनिक स्थान । तेंचि समजावें तीर्थ महान ।

 तेथेचि लागावें तन-मन-धन । दानशूरांचें ॥५९॥

 

तीर्थी कोणी खर्च न करावा । आधी गांवमार्ग सुधारावा ।

 तरीच तीर्थाचा पुण्यठेवा । गांवीं मिळेल सेवेने ॥६०॥

 

वांचवूनि ग्रामसंपत्ति । गांवाची पवित्र घडवावी मूर्ति ।

मग न जातांहि क्षेत्रीं तीर्थी । पुण्य लाभे ग्रामोध्दारें ॥६१॥

 

सप्ताहएक्केयज्ञउत्सव । यासाठी वर्गणी होते ती सर्व ।

 कांही वर्षें सुधाराया गांव । याच कामीं लावावी ॥६२॥

 

जयंति असो वा पुण्यतिथि । सप्ताह असो वा हवनेंपंगती ।

पाहावी गांवाची राष्ट्राची स्थिति । तैसेंचि करावें पुण्यकर्म ॥६३॥

 

सर्व पंथीयांनी मिळावें । सर्वांच्या हिताचें कार्य उभारावें ।

 हेकटपणें भरी न भरावें । भलतियाचि ॥६४॥

 

नाहीतरि महानुभाव पळे रानीं । देवीभक्त सज्ज होती बलिदानीं ।

कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनि । एकलकोंडे ॥६५॥

 

कोणी वर्गणी गोळा करून । देवीसि देती पशूंची दावण ।

 परि रोग न जाती ग्रामसफाईविण । ऐसे उत्सव केलियाने ॥६६॥

 

कोणी गांवच्या यात्रेमाजीं । नाना अनिष्ट कामकाजीं ।

पैसा उधळोनि पेरती समाजीं । जहरचि जैसें ॥६७॥

 

त्यासाठी करावी यात्रा-कमेटी । यात्रा-मेळा-उत्सव-पर्वणी-हाटीं ।

 करावया सुधारणा उठाउठीं । राष्ट्रीयतेच्या ॥६८॥

 

ग्रामोन्नतीचीं आयोजनें करावीं । शक्तिबुध्दीने राष्ट्रीयता भरावी ।

आपुल्या गांवाची कीर्ति जावी । दिगंतरीं तीर्थाऐसी ॥६९॥

 

गांवीं अथवा गांवाजवळी । यात्रा-मेळा असे ज्या काळीं ।

 तेथे सेवा करावी सगळी । स्वयंसेवक होऊनि ॥७०॥

 

तैसेंचि आपुल्या गांवचें वैशिष्टय । तें जगापुढे मांडाया स्पष्ट ।

 प्रदर्शनसंमेलनयात्रादि इष्ट । सुरू करणें आपुल्या गांवीं ॥७१॥

 

सुंदर मार्ग सरळ निर्मळ । स्वच्छ आरोग्यदायी जळ ।

 ग्रामरचनेंतील आदर्श सकळ । वर्तावेत तेथे ॥७२॥

 

शौचकूप मुत्र्या चहूं बाजूंनी । नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी ।

जेणें देश चढे उच्च स्थानीं । वैभवाच्या ॥७३॥

 

नाना मनोरंजनें चालवावीं । परि व्यसनें तमाशे येऊं न द्यावीं ।

 लोकांस हळुहळु लावीत जावी । रुचि राष्ट्रीयतेची ॥७४॥

 

उद्योगाच्या सुंदर कला । वाद्यकलादि व्यवहारकला ।

माणुसकीच्या आचारकला । योजाव्या तेथे ॥७५॥

 

माणसाने मार्गी कैसें चालावें । कैसें बसावें कैसें बोलावें ।

आपुलें वर्तन कैसें ठेवावें । घरांत आणि समुदायांत ॥७६॥

 

याचा सुंदर पाठ द्यावा । सर्वांचें ऐक्य शिकवावें गांवा ।

यात्रा-उत्सवें संचार व्हावा । नवतेजाचा सर्वांमाजीं ॥७७॥

 

अनिष्ट प्रथा बंद कराया । सेवकें झिजवावी काया ।

 यात्राशुध्दीच्या नाना उपाया । अवलंबावें ॥७८॥

 

स्वामी दयानंद महाराज । तैसा त्यांचा आर्यसमाज ।

यांनीहि केलें झटूनि काज । सुधारणेचें यात्रिकांच्या ॥७९॥

 

गाडगे बाबा वैराग्यमूर्ति । तैसीच सेवामंडळ-समिति ।

 यात्राशुध्दीसाठी उत्तम रीतीं । प्रयत्नशील सर्वदा ॥८०॥

 

त्या प्रकारें गांवचे सज्जन । मिळवोनि करावें यात्रा-नियोजन ।

 यात्रा म्हणतां ’ या तरा ’ ही खूण । पटावी लोकां ॥८१॥

 

प्रचंड समुदाय जमवावा । उत्तम सदुपदेश करावा ।

 संत-नेत्यांनी लौकिक वाढवावा । लोक-जीवनाचा ॥८२॥

 

हजारो लोक जरी जमले । तरी आरोग्य जराहि नाही भंगलें ।

लोक सहजपणें आले-गेले । ऐसी व्हावी व्यवस्था ॥८३॥

 

गेले ऐकोनि कथा-कीर्तन । घेतलें जीवनाचें सामान ।

भेटले परस्परांशीं आदरें पूर्ण । देवाण-घेवाण उत्तम ॥८४॥

 

याची असावी रूपरेषा । कराव्या नाना समित्या ऐशा ।

 जनतेमाजीं सुधारणा आपैशा । घडोनि यावया ॥८५॥

 

नाना प्रदर्शनें उपयुक्त । नाना चढाओढीहि त्यांत ।

तैसेचि लोकशिक्षणाचे समस्त । कार्यक्रम योजावे ॥८६॥

 

यात्रादिकांच्या निमित्ताने । घ्यावीं भिन्न पंथीयांचींहि संमेलनें ।

संत-विद्वानांचीं ठेवावीं भाषणें । निर्भेळ विचारांचीं ॥८७॥

 

न दुखवितां कोणाचा भाव । त्यांच्या सत्तत्त्वाचा करावा गौरव ।

 समारोप करावा लक्षूनि एकत्व । मूळचें सत्य ॥८८॥

 

तेथे भिन्नपण विरोन जाय । दांभिकतेचा न चले उपाय ।

 विचित्रपणें वेगळा राहे । वाहोनि जाय प्रवाहीं तो ॥८९॥

 

हिरा आणि कांचवटी । कळों लागेल खरीखोटी ।

 जाहीरपणें विचार-कसोटी । लागतां ऐसी ॥९०॥

 

कोण संत कोण असंत । काय मिथ्या काय सत्य ।

तें जाणोनि धरितील पंथ । समन्वयाचा सर्व जन ॥९१॥

 

हत्ती दिसों लागतां सगळा । मग कोणीहि एकांगी आंधळा ।

 भुलवूं न शके वेगवेगळा । भागचि हत्ति म्हणवोनि ॥९२॥

 

ज्या संत-देवांच्या नांवांवरि । पंथ वाढले परोपरी ।

त्यांचे सत्य संदेश घरोघरीं । पोहोचतांचि सर्व साधे ॥९३॥

 

जैसा गुरु गोविंदसिंहानी । ग्रंथसाहेब रचिला जनीं ।

भिन्न संतांची एकत्र वाणी । झाली संघटनीं पोषक ॥९४॥

 

महिपतींनी संत-चरित्र । मांडोनि सदभावें एकत्र ।

 भाविकजनीं ओविलें सूत्र । एकपणाचें जयापरी ॥९५॥

 

ज्ञानेश्वरादि संतीं केला । पंढरपुरीं गोपालकाला ।

 सर्व पंथांच्या संतांचा झेला । गुंफियेला ज्या भावें ॥९६॥

 

तैसें संतांचें संमेलन । आणि सर्व संत-स्मृतिदिन ।

 पाळतां गांवीं जन-ऐक्य पूर्ण । सहजचि साधतसे ॥९७॥

 

सर्व नद्या सागरीं मिळोन । पावती महान तीर्थपण ।

 तैसे सर्व पंथ ऐक्य साधून । करिती गांवा तीर्थरूप ॥९८॥

 

कोणत्याहि संतांचा करावा उत्सव । परि चमत्कारांचा नको गौरव ।

 द्यावा कर्तव्यमार्गासि उठाव । त्यांच्या जीवना स्मरोनि ॥९९॥

 

ऐसे कार्योत्सव चालतां गांवीं । तीच भू पंढरी समजावी ।

जेथे नरनारी प्रसन्न बरवीं । दु:खी कोणी असेना ॥१००॥

 

ऐसें न करितां आपुल्या गांवीं । तीर्थी घडलीं जरी आघवीं ।

तरी मुक्ति न पावे जीवीं । तुकडया म्हणे ॥१०१॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

 यात्रा-मेळयांचा शुध्द संकेत । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥१०२॥




अध्याय २४ वा ऑडीओ स्वरुपात --



 

।।जय गुरुदेव।।