.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

शुक्रवार, ९ जून, २०१७

भजन १


अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे ।
खेळ हे निसर्गे त्याच्या कार्य-पूर्तिचे ॥धृ॥

वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी ।
पृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥माझ्या०॥१॥

वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी ।
सुंगधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजे ॥माझ्या०॥२॥

पृथ्वी अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी ।
जळति द्रव्य-धातू सगळे, हवन होतसे ॥माझ्या०॥३॥

सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी ।
पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥माझ्या०॥४॥

निर्विकल्प चिद्‍ आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही ।
दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥माझ्या०॥५॥







·         अनुभव-योगी सद्गुरु माझा, एकांती बोले ।
स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोबिशि अपुले ॥धृ॥

शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता ।
मायावी हे त्रिगुण जाणुनि, नच जा या पंथा ॥१॥
चिन्मयरूपा पाहि स्वरूपा, कां भुलला बापा !
सहजासनि बैसुनी सोडवी, चौर्‍यांशी खेपा ॥२॥
चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल ।
अधो-ऊर्ध्व त्या शुन्य-महाशून्यात असे बाळ ॥३॥
नाद-बिंदु साधुनी, ध्वनीला अंतर्गत ठेवी ।
ध्यानी ध्याता साक्षी होशी, मग अमृत सेवी ॥४॥
नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा ।
तुकड्यादास म्हणे स्वानंदी, पावे भव भंगा ॥५॥

·         अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥धृ॥
किति धनिक तुझे कुल होते, तुज भानचि याचे नव्हते ।
ही विघ्ने कुठुनी आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥१॥
तव गोत ऋषींनी भरले, क्षत्रिये द्वार रक्षीले ।
का अघटित चिंता व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥२॥
अति कलावान तव स्नेही, ज्या पहातचि परके राही ।
भिक्षेची वेळ ही आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥३॥
या एकचि कारण झाले, तव घरी ऎक्य ना उरले ।
घरभेदी दिवटी व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥४॥
तुकड्याची भोळी वाणी, घेशिल का थोडी कानी ?
तू दुजा भीक ना घाली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥५॥

·         अवचित हा संत-संग, लाभल अम्हा ॥धृ॥
पावन हा देह होय, क्षणभरि जरि बोध लाहे ।
उघडुनि घे कर्ण जरा, सोडुनी भ्रमा ॥१॥
दूर प्रभू राहतसे, पाप-पुण्य पाहतसे ।
कर्म-फळा देत तसे, करुनिया जमा ॥२॥
चुकविति हे कर्मबंध, लावुनिया कृष्ण छंद ।
दुर्दैवहि होत मंद, दाविती सिमा ॥३॥
तुकड्याची मात ऎक, घे गुरुचे बोध-सौख्य ।
तोडी भव-क्लेश दुःख, पुण्य-पथ क्रमा ॥४॥


·         असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥
तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥
'हा देह मी' म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥
संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ॥३॥
नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥
जाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ॥५॥
तुकड्यास ठाव दे अता, नच भासो देहात्मता ॥६॥



·         अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली ।
लागला ज्वाळ हृदयाला, वेळही कायशी उरली ? ॥धृ॥
गमे हा मार्ग हिंदुंचा, बिघडला लोपता झाला ।
पाहती तोंड दुसर्‍याचे, सोडुनी नीति ही अपुली ॥१॥
कुणी त्या चर्चला जाती, कुणी पुजताती पीराला ।
आपुली सोडुनी नीती, हिंदुची भ्रष्ट मति झाली ॥२॥
न यांना धर्मही कळतो, समाजी देह ना वळतो ।
न ठावे राजकारण ते, गती अधरापरी झाली ॥३॥
कारणही व्हावया ऎसे, एकची वाटते मजला ।
पारतंत्र्यी भरत-भू ही, आपुली माउली पडली ॥४॥
करा हो एकमेकांना. संघटित प्रेम लावूनी ।
जागवा राष्ट्र-भक्ती ही, म्हणे तुकड्या त्यजा भूली ॥५॥

·         आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ?
साच बोलुनी साचचि करशी, वाटे मज साचे ॥धृ॥
श्रृती-वेद बहु शास्त्रे वर्णिती 'भक्ती प्रिय तुजला'
'याविण काहीच न रुचे आणिक', सत्य बोल मजला ॥१॥
राख राख प्रभु ! लाज आज रे ! घे पोटी पापी ।
तुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी ॥२॥

·         आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई ! ।
जाइल वाया ही नरकाया, वेळ बरी नाही ॥धृ॥
बाळपणापासुनी व्यर्थ ही, तनु गेली वाया ।
कोठवरी दुःखाचे डोंगर, सोसु शरिरी या ? ॥१॥
'हे माझे ते माझे' म्हणता, नच निवती डोळे ।
विषयसुखाच्या गरळी माते ! रात-दिवस खेळे ॥२॥
सुख नाही क्षण-मात्र जिवाला, गति श्वानावाणी ।
पोटाच्या कारणे धडपडी, सुकरवत जाणी ॥३॥
भले पसरले अधोर वन हे, पडलो त्या माजी।
काम-क्रोध-मद-मत्सर श्वापद, शरिरांतरि गाजी ॥४॥
ऎसि ऎकिली मात दयाळे ! तूचि दया करिशी ।
भक्तकामकल्पद्रुम जाणुनि, आलो तुजपाशी ॥५॥
तुकड्याला दे ठाव, पार कर नाव अभाग्याची ।
न तरी गेले ब्रिद हे वाया, तुला लाज याची ॥६॥



·         आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची ।
त्याविण ना सुख वाटे, या देहा अन्यची ॥धृ॥
तुटकीशी झोपडी ही गमते महालापरी ।
जव नांदे भक्ति-भावे, माझा तो श्रीहरी ॥१॥
कुंपण आणि बोरिबारी, गमतो हा बागची ।
तुळशीची दाट झाडी, शोभा ही स्वर्गिची ॥२॥
अम्हि हरिचे म्हणविताना, बहुमाना पावतो ।
ऎश्वर्य फोल सारे, त्याविण ते समजतो ॥३॥
जरि न मिळे अन्न खाया, ल्यायासी चिंधुडी ।
तुकड्याची रंगि रंगो, हरि-भक्ति चौघडी ॥४॥

·         आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ॥धृ॥
जीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा ।
विसरताचि एक क्षण, अंगि येति काटे ॥१॥
नेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा ।
त्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ॥२॥
मधुर ध्वनि बंसरिचा, नाश करी षड्‍ -अरिचा ।
बाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ॥३॥
तुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक ।
त्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ॥४॥

·         उठा रे आर्य पुत्रांनो ! चला सांगू प्रभुपाशी ।
प्रभु का कोपला ऎसा ? जरा ना सौख्य आम्हासी ॥धृ॥
उडाली भूमिची सीमा, पिकेना तिळभरी शेती ।
खर्च ही ना निघे काही, राहती लोक उपवासी ॥१॥
सदाचा त्रास हा देहा, गुलामी सान थाराला ।
नृपाचा धाक बहु मोठा, गांजितो फार जनतेसी ॥२॥
विषारी चित्त जनतेचे, पसरले वैर-वन सारे ।
निघाले वक्ष पापांचे, फळांच्या वाढल्या राशी ॥३॥
गुप्त हे जाहले साधू, भोंदुचा भार बहु झाला ।
नीतिशास्त्री-पुराणांची, फजिती वाढली खाशी ॥४॥
जगाला सौख्य तरि द्यावे, नाहि तरि मृत्यु अर्पावे ।
हाल हे नावरे आता, भारताची गती कैसी ? ॥५॥
म्हणे तुकड्या चला गाऊ, आपुली खास ही दैना ।
'सखा तो तारि भक्तासी', पुराणे गर्जती ऎसी ॥६॥

·         उणा पाहशील दुसर्‍याला, उणीवेने उणा होशी ।
समजशी पूर्णता सगळी, अमर सुख अनुभवा घेशी ॥धृ॥
न जग हे तिळ उणीवेचे, असे भरले सुखत्वाचे ।
प्रभू नटुनीच जग साचे, पाहतो मौज ही खाशी ॥१॥
कुठे तो वृक्ष होऊनी, पाहतो शांतता अपुली ।
कुथे नदिच्या प्रवाही हा, राहुनी तृप्ति दे त्यासी ॥२॥
कुठे होऊनिया राजा, प्रजेला सूख दे सगळ्या ।
कुथे होऊनि अतिदीन, मागतो भीक जनतेसी ॥३॥
सर्व हा देवची नटला, जाणुनी अनुभवा घेणे ।
तो तुकड्यादास सांगतसे, भागवति रीत ही ऎसी ॥४॥

·         उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी ।
 गर्जती भक्त तव दारी, जरा तरि ऎक बा ! कर्णी ॥धृ॥
 दुष्ट संहारण्याकरिता, तुझा अवतार तो होता ।
अता का जानकीनाथा ! दिसेना भूवरी कोणी ? ॥१॥
 कितीतरि त्रास भक्तांना, कुणाला हाल बघवेना ।
 मिळेना अन्न पोटाला, किती मरती दुखे प्राणी ॥२॥
ऊठ घे चाप धर हाती, असुर मर्दावयासाठी ।
 राख बा ! लाज भक्तांची, न तुजविण दान दे कोणी ॥३॥
 सांग हनुमंत ताताला, कि 'वर दे आपुल्या भक्ता ।
पाहशी अंत किती आता ? धरी तुकड्या सदा चरणी ॥४॥

·         कठिण मन का हरी ! केले, नसे का तुज दया थोडी ?
तुझ्याविण अखिल या जगती, कोण आम्हासि रे ! जोडी ? ॥धृ॥
अशाश्वत दृश्य हे सगळे, कधी दिसते, कधी नसते ।
 राहते नी किती जाते, साथ हा घाट मम सोडी ॥१॥
 स्वार्थि या लोकिचे गाणे, प्रेमही स्वार्थिचे जाणे ।
कळेना कोण हे जीणे ? कुठे वाढे, कुठे मोडी ? ॥२॥
अनुभवे पाहता जगती, न काही सत्यसे दिसते ।
प्रभू ! तूची खरा असशी, म्हणुनि ही गर्जना फोडी ॥३॥
पदरि घे दास-तुकड्याला, उरु न दे देह-भावाला ।
 रंग तव लाव जीवाला, देह तुजवरुनि कुरवंडी ॥४॥

·         कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ?
सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥
 न कोणी वीर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी ।
लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥
 मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली ।
 बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुख फिरती ॥२॥
 मिळेना अन्न कोणाला, कुणी धन सांचुनी ठेवी ।
प्रेम स्वार्थाविना कोठे, कुणाचे ना कुणावरती ॥३॥
 न साधू बोध दे कोणा, मौन धरि बघुनि पापासी ।
 तो तुकड्यादास सांगतसे, तुझ्याविण ना मिटे भ्रांती ॥४॥

·         कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ?
सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥
 न कोणी वेर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी ।
लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥
 मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली ।
बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुखे फिरती ॥२॥
 संतही सांगती ऎसे, पुराणे गर्जती ऎसे ।
अनुभवा सांगती ऎसे, धडपडी व्यर्थ का धरिशी ? ॥३॥
धरी सत्संगती जाई, मने मनि उन्मनी लावी ।
 तो तुकड्यादास दे ग्वाही, सुखी मग तू स्वये होशी ॥४॥

·         कधी भेटशिल माय दयाळे ! दीन अभाग्यासी ?
बहु त्रासलो मन आवरता, ने अपुल्या पाशी ॥धृ॥
 बहिर्सग हा भोवति पाहता, भय वाटे भारी ।
 धीर न धरवे पहाडी राहता, चोरांची नगरी ॥१॥
 भयाभीत हो उनी, नेत्र धावती तुझ्या पायी ।
 या षड्‍ रिपुचा मेळा पाहता, घाबरलो आई ! ॥२॥
 नाहि योग-साधना समजली, वर नेऊ प्राणा ।
शिकावयाची नुरली इच्छा, सोडुनिया चरणा ॥३॥
भक्त-काम कल्पद्रुम तू गे ! घे करुणा माते ! ।
तुकड्यादासा प्रेम दावुनी, ने अपुल्या पंथे ॥४॥

·         कर आपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला० ॥धृ॥
सद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा ? ॥१॥
 चलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ॥२॥
 गुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ॥३॥
तुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य गा ॥४॥

·         करा रे ! कृष्ण गडी अपुला ।
 मिटे न मैत्री जन्म-जन्मि ही, देह जरी गळला ॥धृ॥
 फुकाचे नाम जपा त्याचे ।
धन-संपत्तिस वाण न राहे, लक्ष्मि घरी नाचे ॥१॥
लावता चित्त तया पायी ।
अखंड अमृत-झरा जिवाला पावे लवलाही ॥२॥
 धरिता ध्यान सगुण त्याचे ।
 विश्व ब्रह्म हे कृष्णचि जिकडे तिकडे जगि भासे ॥३॥
देह अर्पिता तया चरणी ।
 वैकुंठाचे राज्य मिळे, करिती जन मनधरणी ॥४॥
जरासे देता अति भेटे ।
तुकड्यादास म्हणे कानी घ्या, लक्षि धरा नेटे ॥५॥

·         करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥
तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥
 भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥
गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥

·         कसा हरि ! स्वस्थ तू आता ? वेळ ही काय उरलीसे ?
राहिला धर्म किती ऎसा, तुला का याद नुरलीसे ? ॥धृ॥
 जनाची वृत्ति बहिरोनी, पुरी नास्तीकता आली ।
 न कुणि पुसताति कोणाला, प्रेम-मायाच हरलीसे ॥१॥
 न साधू लक्ष दे धर्मा, न पंडित सांगती वर्मा ।
 स्वार्थता भासते सगळी, दयेची वाट सरलीसे ॥२॥
अशी ही अवदशा आता, कोठवरि ठेविशी देवा ! ।
 हाक घे दास तुकड्याची, वासना हीच धरलीसे ॥३॥

·         का धरिशी मनि कोप दयाळा ! वद गिरिजा-रमणा ! ।
 नको दुरावू दीन अभाग्या, घे अपुल्या चरणा ॥धृ॥
 तात-मात-गणगीत तुझ्याविण, कोणि नसे वाली ।
का लोटियशी निष्ठुर हो उनि, कृपणा वनमाली ! ॥१॥
सोडुनिया तव चरण दयाळा । जाउ कुठे रानी ?
 निर्बळासि भय दावुनि म्हणशी 'मजला नच मानी ' ॥२॥
 नको मला हा प्रपंच-भारा, तुझ्या मायिकांचा ।
येउनिया दे भेट कृपाळा ! निश्चय अंतरिचा ॥३॥
भक्त-काम-कल्पद्रूम म्हणविशि, वेद-मुखेकरुनी ।
तुकड्याची ही आशा पुरवी, भव ने हा हरुनी ॥४॥


·         काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऎसे ।
 दुःख हे मोहपाशाचे, अता तिळमात्र ना सोसे ॥धृ॥
 क्षणक्षण काळ हा टपला, लिहाया कर्म जे केले ।
चुकेना भोग कोणाला, करू जैसे भरू तैसे ॥१॥
स्वार्थि हे लोक अवघेची, न कोणी साथ दे अंती ।
 न कामी देह-इंद्रिय हे, न लागू याचिये कासे ॥२॥
सखा जो पंढरी-राणा, जिवाचा एक कनवाळू ।
 भजू त्यासी मनोभावे, यथामति जाणतो जैसे ॥३॥
 म्हणे तुकड्या जगाची ही, उपाधी घात करणारी ।
 कळो आले अता सगळे, न कोणी यात संतोषे ॥४॥

·         किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी ।
मनि लावितसे अति वेड मला ॥धृ॥
 पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ॥१॥
वक्षस्थळावर माळ विराजे, कटि पीतांबर हा कसला ॥२॥
मोरमुकुट हा अति झळके शिरि, अधरि धरी पावा अपुला ॥३॥
 तुकड्यादास म्हने मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ॥४॥





·         कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्मे त्यजता का ?
नीति ही सोडुनी सारी, प्राण परक्यासी विकता का ? ॥धृ॥
 आठवा बाळ अज्ञानी, गुरु गोविंदसिंहाचे ।
 पुरवि भिंतीमधी त्यांना, न सोडी धर्म तरि ते का ? ॥१॥
 सोडता धर्म जरी संभा , न उंचचि राहती डोकी ।
मर्द हा मरती गळ फासे, न दुसर्‍यासी म्हणे 'काका' ॥२॥
धर्म तो शिकवितो सकळा, अमर हा अंतरी आत्मा ।
मराया का भिता ऎसे ? ना तरी देह राहिल का ? ॥३॥
 बाळगा धाक देवाचा, जरी पापे करी कोणी ।
 आपुल्या सुखस्वातंत्र्या, म्हणे तुकड्या विसरता का ? ॥४॥

·         कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे, नच साधु ढळे हरिच्या भजना ॥धृ॥
वाहताति कुणि फल, पुष्प शिरी, कुणि भावबळे घरि ने अपुल्या ।
 कुणि निंदिती मार्गि, शिव्या वदनी, सुखदुःख न होय जराहि मना ॥१॥
कुणि देति किती, कुणि नेति किती, कुणी खाति किती, गणतीच नसे ।
कधि लाडु पुरी, कधि भूक उरी, कळणा-घुगरी हरि देत तना ॥२॥
कुणि मान कराया नेत सभे, कुणि प्राण हराया नेत गिरी ।
समतोल तयाची वृत्ति सदा, नच द्वेष-प्रीती कुजना-सुजना ॥३॥
शित-उष्ण असो वा वृष्टि असो, जनलोक असो वा कानन हो ।
 मरणी जननी नच खेद जिवा, सदनीहि जसा तैसाचि रणा ॥४॥
नच रंग कधी विसरे अपुला, आनंदस्वरूप अनादि सदा ।
 पदि लीन तया तुकड्या नमुनी, ज्याच्या न कळे कवणास खुणा ॥५॥

·         कुणि दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? ॥धृ॥
 दंड-कमंडसु त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी ।
पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ॥१॥
कोल्हापुर ला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा ।
स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सद्गुरुराजा ॥२॥
जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया ।
तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ॥३॥

·         कुणि भावबळे आणा हरिला । कुणि प्रेमबळे आणा हरिला ॥धृ॥
 ना कळतो तो यम-नियमांनी, ना कळतो तप साधुनिया ।
 ना कळतो वनि जप करण्याने, भक्तीने वश होय भला ॥१॥
 कठिण मार्ग हा असाध्य बहुता, योग-याग-विधि-प्रणवाचा ।
साध्य होय प्रभु गोड गाउनी, जैसा द्रौपदिला झाला ॥२॥
कृत-त्रेता-द्वापारी बघता, कठिण मार्ग वेदे वदला ।
 'कलीयुगी प्रभु नाम-बळाने, वश होई' संती कथिला ॥३॥
तुकड्यादास म्हणे आला हरि, भारतभू ही बघण्याला ।
म्हणा 'धर्म हा जात लया, प्रभु ! का ऎसा निष्ठुर झाला ?' ॥४॥

·         कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी ! ।
नव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ॥धृ॥
 काम-धाम नाठवते, मार्गि चालता ।
पाहु कुठे तुजसि ? गमे, अंतरी वरी ॥१॥
 बोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं ।
वेडियापरीच पाहती, मला तरी ॥२॥
 झोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता ।
कार्य साधता न कार्य, वाटते करी ॥३॥
 रंग एकसा, निशेपरीच वाटतो ।
तुकड्याची वेळ ही, अशीच राखजो तरी ॥४॥

·         कुणि सांगिता पता हरिच्या, गावि जावया ।
मन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया ॥धृ॥
म्हणताति संतही देती, मार्ग दावुनी ।
 इतुका करा उपकार, तया भेटवा कुणी ।
अर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ॥१॥
 रानी वनी कुणी फिरती, लाभण्या रुपा ।
 दरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा ।
 परि दूर हरि हा न दिसे, कष्ट करुनिया ॥२॥
कुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी ।
परि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी ।
 तुकड्यासि दया द्या इतुकी, लाभावा तया ॥३॥

·         क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे ।
 करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥
 (अंतरा) जरि योग-याग बहु केले ।
मन-पवन समाधी नेले । वनि निर्जनि घर बांधियले ।
तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥
(अंतरा) जगि तीर्थधामही नाना ।
 दरिकंदरि ऋषिच्या स्थाना ।
जी मोहविती शरिरांना ।
 ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥
(अंतरा) अति पंथ-मतांतर लोकी ।
 परि आस पुरेना एकी ।
 जळजळती एकामेकी ।
नच शांति वृत्तिला येइ, करी हृदया कावरे ॥३॥
(अंतरा) सत्‍ संग सुगम यासाठी ।
व्हावया वृत्ति उफराटी ।
परि बोध पाहिजे गाठी ।
विश्वास असा तुकड्यास,'अनुभवा दे भाव' रे ! ॥४॥

·         गुरु येउनी मज भेटला, नि 'भक्ति कर' म्हणे ।
'विसरूच नको श्रीहरी, अति प्रेम धर' म्हणे ॥धृ॥
 'अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या ।
 जे दुष्ट लोक त्यांची, संगतीच हर' म्हणे ॥१॥
'नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया ।
 मन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर' म्हणे ॥२॥
 'दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या ।
 प्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर' म्हणे ॥३॥
 'नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग तू'
तुकड्यास सदा 'सत्यप्राप्ति, हाचि वर' म्हणे ॥४॥

·         गुरु-बोधावाचुनीया, पथ नाही भुक्तिचा ।
 बोधाने सुलभ होई, पथ प्रभुच्या भक्तिचा ॥धृ॥
 विण भक्ती ज्ञान नोहे, प्रभुचीया सृष्टीचे ।
विण ज्ञाने व्यर्थ होते, कळणे हे व्यष्टीचे ॥१॥
 जरि कळले देह-धर्मे, कळणेची ते नव्हे ।
 जरि वळले एकपोटा, वळणेची हे नव्हे ॥२॥
म्हणुनीया संत गाती, गुरु-भक्ती सर्वदा ।
 तुकड्याची हाक तेची, गुरु शोधावा सुदा ॥३॥

·         गुरुराज कृपाकर ठेवुनिया,
अजि ! चारितसे निजज्ञान-फळे ॥धृ॥
सत्वगुणी करवूनि भुमी, श्रध्दा-बिज पेरितसे मधुनी ।
 सत्संग-जलाने ओलवुनी, तो बोध-तरूवर लावि बळे ॥१॥
 शांति-दया अति कोमलसे, फुटती तरुसी त्या पल्लव हे ।
 शाखा अष्टादिक भाव जया, संलग्न अती रमताति जुळे ॥२॥
 भक्ति-फुलांचा भार बहू बहरावरि चित्त रमे भ्रमरू ।
 आनंद मृदु पवनी डुलतो, सुख देत सदा तरु प्रेमबळे ॥३॥
ज्ञान-फळे अति गोड रुचे, रस सेवु मुखाविण त्या तरुचे ।
 तुकड्या म्हणे घ्या रे ! ज्यास रुचे, या या पुढती, व्हा मुक्त बळे ॥४॥




·         चला पंढरी, पंढरी पहायासी । विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ॥
 कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो 'या या'
 दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या ॥१॥
दासि जनीच्या, गोवरिया वेची, शेती राखतो सावताची ।
 रसिद नेउनी, बेदरि दामाजीची, मडकी घडवित गोराची ॥२॥
सोडि वैकुंठ, वैकुंठ मूळपीठ, धरिली मृत्युलोकि वाट ।
भीवरे तिरी, बसवुनीया पेठ, उघडले दुकान चौहाट ॥३॥
खरेदी केली, पुंडलीके सारी, घेतला विकतचि गिरिधारी ।
 भक्तिभावाने, काय त्याचि थोरी, आपण तरुनि दुजा तारी ॥४॥
अती आनंद, आनंद वर्णवेना, भक्त नाचति मिळुनि नाना ।
 टाळ-तंबुरे, मृदंग-ध्वनि ताना, मारती रंगुनिया ध्याना ॥५॥
दास तुकड्याची मति कुंठित झाली, पाहता विठ्ठल वनमाळी ।
बघा एकदा, येउनिया जन्मा, करा सार्थक रे ! गा नामा ॥६॥


·         चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू ।
भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥धृ॥
 बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी ।
 करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ॥१॥
आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना ।
प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ॥२॥
 विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्विची पेठ ।
दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू ॥३॥
 न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा ।
म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ॥४॥


·         जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ? ॥धृ॥
 बहु लोकेषणा मागे, न मिळतो वेळ ध्यानासी ।
 खोवुनी वेळ ही ऎसी, कसा होशील रे ! साधू ? ॥१॥
 इंद्रिये स्वैर चहू देशी, विषय भोगावयासाठी ।
लावुनी पाश हा पाठी, कसा होशील रे ! साधू ? ॥२॥
 फसविती वासना सगळ्या, जगाच्या सौख्य-मोहाने ।
 न वृत्ती स्थीर करिशी तू, कसा होशील रे ! साधू ? ॥३॥
म्हणे तुकड्या गृहस्थी हो, करी संसार नीतीने ।
 जराशा पोट-भीतीने, कसा होशील रे ! साधू ? ॥४॥

·         जाइल हा नरदेह गड्या ! मग काय पुढे करशील मजा ? ॥धृ॥
 चार दिवस हे हौसेचे, समजोनि राहशी अंतरी तू ।
अति दुःख पुढे यम देइ जिवा, मग कोण तुला देईल रजा ? ॥१॥
करशील जसे भरशील तसे, चुकते न कसे कोणीही असे ।
 तुकड्यादास म्हणे काय अम्हा करणे ? हुशियार रहा भरशील सजा ॥२॥

·         जिवलग गुरुविण कोणि न मनुजा !
जग हे स्वार्थ-सुखाचे सगळे, शेवटि साथि न येई मनुजा ! ॥धृ॥
 धनद्रव्यावर नाती टपती, द्रव्य जाय मग झुकुनि न बघती ।
सकळ जगाची ऎसी रीती, हीन-दिना कुणि जाणि न मनुजा ! ॥१॥
देह साजरा तोवरि कांता, रोगि होय मग घेई माथा ।
 सांग सांग मग कोण अनाथा ? पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ॥२॥
 दीनाचा एक सदगुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा ।
 तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ॥३॥

·         झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा ॥धृ॥
 झुणु झुणु वाजति भूवरी पर्णे, कोकिळ गाती हर्षभराने ।
 मयुर नाचती अति प्रेमाने, मन घेइल हे विश्राम । गमे हा० ॥१॥
 नीलवर्ण आकाशी उठला, वाटे हरि गरुडावरि आला ।
झू-झू ध्वनि कर्णी आदळला, वाटली बंसिची तान । गमे हा० ॥२॥
 किरण मंद पिंगटसे उठले, मंद मंद वायू हा चाले ।
झिलमिल पाणी सुरू जाहले, झाले इंद्रिय एकतान । गमे हा० ॥३॥
 गर्व तरूवर हलती सगळे, ऎकति पशु काननिचे चाळे ।
तुकड्यादास म्हणे गोपाळे, उरि भेटतसे बेफाम । गमे हा० ॥४॥

·         'झणि हासति काय मला जन हे', ही लाज मनी तिळमात्र नको ॥धृ॥
 कार्य करा प्रभुला स्मरुनी, निःस्वार्थपणी प्रियता धरुनी ।
 मग वानो कुणि निंदाहि कुणी, अभिमान मनी तिळमात्र नको ॥१॥
हे विश्व मकान खरे अपुले. समजोनि करी मग जीव-दया ।
 अति क्रूर असूर असेल कुणी, वधण्यासि दया तिळमात्र नको ॥२॥
 निर्माण करा प्रभुची, प्रभु देइल मोक्ष ययाचि मता ।
तुकड्या म्हणे काय अरे ! बघता ? घ्या कार्य करी अजि, वेळ नको ॥३॥

·         टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी ।
 उगिच पापे करुनिया ही, जिवाला कष्टमय करिशी ॥धृ॥
 किती राजे, महाराजे, होउनी जाति नी येती ।
 न कोणी साथ दे काही, तूच का या भ्रमी मरशी ? ॥१॥
 कांचनाची पुरी शोभे, रत्नमय रावणाची ती ।
 ढसळता रीत कर्माची, न उरली कौडि ही सरशी ॥२॥
 अती लोभे, अती पापे, कंस हा मातला होता ।
प्रभु धावोनिया त्याची, राख केली गृहासरसी ॥३॥
 अरे ! जे शोभते तेची, करावे जीव-उध्दारा ।
सांगतो दास तुकड्या हा, प्रभू स्मर सत्य तू सरशी ॥४॥

·         ठेवु कुणावर भार ? कन्हैया ! कोण करिल उपकार ? कन्हैया ॥धृ॥
स्वार्थलोभि ही जनता सारी, मज तारक कोणी न मुरारी ! ॥
जीव कसा जगणार ? कन्हैया ! ॥१॥
जिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया ।
भक्ति कशी घडणार ? कन्हैया ! ॥२॥
 तुकड्यादास म्हणे दिन आम्ही, लावी देह सख्या !
तव कामी । मज तुचि उध्दरणार कन्हैया ! ॥३॥

·         तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥
 मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥
मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥
 नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥


·         दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी ।
 पाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ॥धृ॥
शरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही ।
आंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ॥१॥
 तोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला ।
त्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ॥२॥
नेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी ।
जोवरि न मिळे नेत्रि 'नेत्रिया' तोवरी तू कष्टी ॥३॥
 सोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी ।
पाहि गड्या ! 'डोळ्याचा डोळा' प्रगट दिसे आपी ॥४॥
धन्य धन्य ते गुरूराज, वैभवी स्वरूपाचे ।
 तुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरुपी नाचे ॥५॥

·         धन्य जाहलो, सदगुरुचे चरणी । दाविली अघटित निज करणी ॥धृ॥
 अजब ते घर, सुंदर साजाचे, दिसतसे औट हात साचे ।
तयाचे मधी, जगचालक नाचे, स्वरुप का बोलु अता वाचे ।
 मुखे वदवेना, श्रमली वेदवाणी । दाविली अघटित ० ॥१॥
रत्न लाविले, आत दिव्य सात, तयांचा उजेड चकचकित ।
सदा झगमगे, न बोलवे मात, डुलतसे अजपा दिनरात ।
स्मरण स्फुरणाचे, आवाज घुमघुमित, त्रिवेणीसंगम झुरझुरत ।
 सप्त हौदांचे, लहरावे पाणी । दाविली अघटित ० ॥२॥
बंद ठेविले, ते दसवे द्वार, नऊ खिडक्या त्या चौफेर ।
 आत नांदती, स्त्रिया तिथे चार, तयांचे नावी घरदार ।
मनाजी गडी, करी कारभार, सदा पाहतसे व्यवहार ।
धनी सर्वांचा, एकविसा वरुनी । दाविली अघटित ० ॥३॥
गुंग जाहला, तया पुढे ज्ञानी, वृत्तिशून्यत्व अंगि बाणी ।
तेज फाकले, नच मावे नयनी, संशय विरले सर्व मनी ।
दंग होतसे, निज स्वरुपी प्राणी, सद्गुरु आडकुजी-ध्यानी ।
 दास तो तुकड्या, सहज समाधानी । दाविली अघटित ० ॥४॥

·         धरी निर्धार गुरु वचनी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥
ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे ।
षडविकार अंतरिचे नासुनि, प्रेम मिळे परमार्थाचे ॥१॥
गुरु-वचनी विश्वास धरूनी, किति तरले, तरती जगती ।
देव-ऋषी गुरुच्याचि प्रसादे, भव तरले निर्भयि साचे ॥२॥
 तुकड्यादास म्हणे गुरुज्ञाने, प्रभुचे रुप हृदयीच मिळे ।
 जळेल तम-अज्ञान मतीचे, मन रंगी हरिच्या नाचे ॥३॥

·         धर्म कसला गुलामांना ? खेळ हा पोरखेळांचा ॥धृ॥
आज जी देवळे बघतो, उद्या त्या मसजिदी होती ।
कधी त्या चर्चची बनती, न उरला नेमची त्यांचा ॥१॥
 दुजाच्या सांगणी वागे, कशाची भक्ति मग जागे ?
 न साधे धर्म या योगे, कळे हा भावची साचा ॥२॥
 तुम्ही बोला तसे वागू, परी अम्हि धर्मची सांगू ।
 देह हा जाहला पंगू, न उरला लेश शक्तीचा ॥३॥
न एका निश्चयी लागे, फिरे दुजियाचिया मागे ।
तो तुकड्यादास हे सांगे, बिघडला मार्गची त्याचा ॥४॥

·         नटला हरि सुंदर विश्व कसा, मन मोहुनि ने बघता जिव हे ॥धृ॥
 कुणि पंख सुरम्य दिसे म्हणुनी, मज दावित काननि या नटुनी ।
 कुणि गोड स्वरे रव काढुनिया, मन रंगविती क्षण या ध्वनिनी ॥१॥
 कुणि क्रूर मुखाते फाडुनिया, मनज दाखविती भय काननि या ।
कुणि दीन गरीब अम्ही म्हणुनी, पळती 'भ्या भ्या' हे वदुनीया ॥२॥
कुणि रम्य तुरंब फाकुनिया, वन साजविती मन लाजविती ।
 कुणि सुंदर रंग सुगंध भरे, फुलवोनि फुले मजसी दिसती ॥३॥
अति सुंदर बाग दिसे असली, हरि ! जाण तुवा रचली सजली ।
तुकड्याची मती-गति कुंठुनिया, पहाता पाहणेपणिही बसली ॥४॥

·         नवल वानु मी किती गुरुचे ? नवल वानु० ॥धृ॥
 दुःसंगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ॥१॥
 अंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ॥२॥
 जग हे भ्रमबाजारी भुलले, विसले तव निश्चिती ॥३॥
तुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ॥४॥

·         नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि जाहला अपुला ।
 असावा प्रेम थोरांचा, वैरि जरि भासला अपुला ॥धृ॥
कुणि अति प्रेम दावोनी, कापताती गळा वेळी ।
 फसे हा जीव त्या योगे, नासतो जन्म हा अपुला ॥१॥
 कुणी अति वैरही दावी, आपुले सार्थकासाठी ।
 परी तो वेळ साधोनी, कामी ये थोर तो आपुला ॥२॥
धरावा संग ऎशाचा, जिवासी सत्यता लाभे ।
 म्हणे तुकड्या हरी-भजने, सुसंगी मोक्ष हा अपुला ॥३॥

·         निरशुनी बघ जरा देवा ! गती अमुच्या समाजाची ।
भारता भीक दे काही, बिघडली रीत रक्ताची ॥धृ॥
 कुणाचा मान ना उरला, विषयरस धुंदसा भरला ।
कुणी दाता नसे उरला, हाव बहु धाव स्वार्थाची ॥१॥
 प्रेम निष्कामि ना कोठे, भक्तिचे ये तनू काटे ।
 जाति पापाचिया वाटे, ढसळली चाल लोकांची ॥२॥
 साधुचे कोणि ना ऎकी, भोंदुपण वाढले लोकी ।
 उसळली वृत्ती असुरांची, भाविकासी बहू जाची ॥३॥
 म्हणे तुकड्या कली आला, निशाणी टेकला झाला ।
संति आधीच गौरविला, तशी झाली खुशी यांची ॥४॥

·         पावना सख्या श्रीरामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥धृ॥
 मशि भेट एकदा वाटे, हा जीव जरा ना कंठे ।
 ये मुनिजन-मन-विश्रामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥१॥
 नर-जन्माचे सार्थक हे, तव रूप पाहणे सुख हे ।
मग कोणि न येति कामा, मनमोहन मेघश्यामा ! ॥२॥
 अनुभवी सांगतो ऎसे, तू जीवाचा सुखराशी ।
 तुकड्याचा पुरवी प्रेमा, मनमोहन मेधश्यामा ! ॥३॥


·         पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥
 दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो ।
'सुख' म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥
 पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ ।
खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥
 सोसियले दुःख किती, परि येईना सुमती ।
 अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥
 बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा ।
होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥
 वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ?
तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥

·         पुनित हा देह करू आपुला ।
 बहु कष्टाने बहु पुण्याने प्राप्त अहो ! झाला ॥धृ॥
खोविता देहाची वेळा ।
कोटी धन वेचता मिळेना दुरावोनि काळा ॥१॥
अमोलिक देहाची संधी ।
 हरि नामाने पुनित करू या, लागू प्रभु-छंदी ॥२॥
 चला रे ! चला उठा वेगे ।
संत-महंतहि अनुभवि गेले, जाऊ त्या मार्गे ॥३॥
म्हणे तुकड्या या भक्तीने ।
 संत तुकोबा साधुनि गेला देवाच्या धामे ॥४॥


·         प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ॥धृ॥
 कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती ।
कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥१॥
 कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे ।
 तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ॥२॥
 कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी ।
 न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ? ॥३॥
 कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला ।
 सुखास्तव झुरती सारे, कळेना मार्ग कोणासी ॥४॥
म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे ।
 दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥५॥

·         फोल ते संत आम्हासी, वागण्यावीण जे ज्ञानी । मुखे करि ब्रह्म-चर्चेला, पळे इंद्रीय अडरानी ॥धृ॥ 'तयाविधि-नेम-ना' म्हणती, जरी चालोत ते कुरिती । शक्य हे होईना संता- 'कधी करतील मनमानी' ॥१॥ तयांना कर्म ना उरले, तरी ते जगति का उरले ? । भोगण्या भोग देहाचा, होतसे पाप का कळुनी ? ॥२॥ जगाच्या पाप-पुण्याची, जरी ना कल्पना त्यांना । खाति आणि राहती कैसे, चटुरे माल खावोनी ? ॥३॥ बुडविला धर्मची त्यांनी, भोंदुना वाव देवोनी । संत ना राहती ऎसे, सारिही ढोंगमय करणी ॥४॥ संत ते मानतो आम्ही, राहती संगती तैसे । तो तुकड्यादास सांगतसे, न इतरा ठाव द्या कोणी ॥५॥


·         बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा ।
तूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा ! ॥धृ॥
त्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा ।
 रिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥
आसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा ।
 कर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥
 ऎसिया चिंतनी वेळ, जातसे निधाना !
लाज वाटे सांगताचि, तुज घनश्यामा ! ॥३॥
करि कृपा त्रास टाळी, जाचणी यमाची ।
 तुकड्यादास ठाव देई, मागणे ते हेची ॥४॥

·         भगवंता ! लक्ष्मीकांता ! तारि बालका ॥धृ॥
मोहविकारे जीव थरारे, कोणि ना सखा ।
संसारी दुःख भारी, कावला फुका ॥१॥
तुझिये स्वरूपी चित्त वसू दे, घेउ दे सुखा ।
 मन रंगो नाम गाता, न घे आणिका ॥२॥
मरणी मरू दे पाहता तुलाचि, नाहि पारखा ।
तुकड्याचि हाक घ्या हो, विसरू नका ॥३॥



·         भारता ! बलवान व्हाया, वाचवी जिव गायिचे ॥धृ॥
लोभ हा सोडी वृथा, का मांस विकसी तू तिचे ?
 चाटुनी नख-पाउला, सुख पावशी का दूरचे ? ॥१॥
 भारताचे पुज्य जे, अवतार कृष्णादीक हे ।
सांगती का हे तुम्हा ? 'घ्या प्राण अपुल्या आईचे' ॥२॥
 याद ही ठेवा मनी, या भारताच्या बंधुनो ! ।
 पुण्य हे फळले अम्हा, त्या अजवरी निज मायिचे ॥३॥
 दास तुकड्या सांगतो, विसरू नका हो गायिला ।
 घ्या दूध, निर्भय होउनी, मिळवा अमरपद स्थायिचे ॥४॥

·         भारती रहवासियांनो ! वाचवा जिव गायिचा ॥धृ॥
सांगतो इतिहास ऎसा, भारताच्या ग्रंथिचा ।
'बहुमोल आम्हा गाय हे, जणु प्राणची मम आईचा' ॥१॥
देश हा कृषि-उद्यमाचा, भोवताली वेष्टिला ।
 धान्य बहु पिकती फळे, हा भाग त्या गो-मायिचा ॥२॥
कष्ट साहुनि देतसे, दहि-दूध-लोणी ही जशी ।
पुत्र देउनि आपुला, वाहवीतसे भर शेतिचा ॥३॥
दास तुकड्या सांगतो, शोधोनि पाहावे बुध्दिने ।
जीव का वधता तिचा ? हा घात निश्चयि आमुचा ॥४॥

·         भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज ।
 उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥
उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू ।
 हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥
 ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत ।
 ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥
घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत ।
अर्धांगि सती पार्वती, गणपती सिध्दिराज ॥३॥
 भूत डाकिणी पिशाच, घेउनी सहीत ।
तुकड्या म्हणे कैलासी, उभारिला ध्वज ॥४॥

·         भाविकाच्या भक्तिचा, नच पंथ कोणी पाहिला ।
प्रेम हा निरपेक्ष त्याचा, सर्वदेशी राहिला ॥धृ॥
 विश्वव्यापी देव त्याचा , बाहिरी अणि अंतरी ।
पूजना हे कार्य त्याचे, देह त्यासचि वाहिला ॥१॥
 सर्व पंथही होत त्याचे, शुध्द जे राहती जगी ।
 ना दुजा कधि भाव त्याचा, 'मी भला, माझा भला' ॥२॥
रंजल्यासी गांजल्यासी, 'आपुले' म्हणवूनिया ।
 कष्टतो सुख द्यावया, करि प्राण खर्चहि आपुला ॥३॥
 अखिल जग हे मंदिरासम, मानुनी सेवा करी ।
 तुकड्या म्हणे तो धन्य साधू, जो जगी या गाइला ॥४॥

·         भुलु नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी ।
लूटती भोंदु अपणाते, दावुनी थोरवी भारी ॥धृ॥
संत जरि पुत्र हे देती, न मरते लोक पृथ्वीचे ।
 निकामी स्वार्थि जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ॥१॥
कावरे लोभि जे असती, भ्रष्ट होती तयाच्याने ।
 न सुचते ज्ञान हे त्यांना, मिरविती भोंदुची थोरी ॥२॥
ठेवुनी साक्ष 'ज्ञानोबा', म्हणे ती भीत चालविली ।
 कळेना वर्म संतांचे, वाहती मार्गि काटेरी ॥३॥
 चमत्कारेच संतांची, परिक्षा होत जरि असती ।
गारुडी काय ना करिती ? लावती बाग आंबेरी ॥४॥
संत तोची जगी जाणा, जयाचे विषय हरि झाले ।
 म्हणे तुकड्या निजज्ञाने, बोधुनिया जना तारी ॥५॥

·         भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा ।
 सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥
 संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी ।
 मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥
ब्रह्मनिष्ठ नारद स्वामी, भोग-भ्रसे रतला कामी ।
 आपणची स्त्रीच्या उर्मी, प्रसवला भवा ॥कोणा०॥२॥
पुत्री विधात्याने धरली, पितृ-भावना ही हरली ।
 भिल्लिणिची प्रीती स्फुरली, भोळिया शिवा ॥कोणा०॥३॥
 सुख-दुःख दैवे पावे, सकळ शास्त्रियांसी ठावे ।
 सांगतसे तुकड्या भावे, येई अनुभवा ॥कोणा०॥४॥

·         मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा ।
 पहायासी कृष्ण ! झाला जिव वेडा आमुचा ॥धृ॥
कुणि सांगा मार्गियांनो ! दिसला तो का कुणा ?
 त्याविण या लोकि झालो, दुबळासा मी सुना ॥१॥
 दचकोनी उठविताना, स्वप्नचिसा भेटला ।
 झणि पाहो परि न भासे, ऎसा का करि भला ? ॥२॥
 अजुनी ना विसरला तो, खेळवणे आपुले ।
 अम्हि दुःखी बहुत त्याने, का ना हे जाणले ? ॥३॥
मज वाटे भेट द्याया, लपुनी तो येतसे ।
 तुकड्याची हाक कानी, लांबुनिया घेतसे ॥४॥

·         मंजुळ हा नाद आला, हरिचीया बंसिचा ।
मनि गमले शोध घ्याया, आला तो आमुचा ॥धृ॥
त्या कळते सर्वभावे, अंतरिच्या ह्या खुणा ।
 लपवोनी काय चाले, भानूच्या भानुना ॥१॥
तो दिसतो हा उभा या नेत्रांचे आतुनी ।
नाचतसे पाहुनीया, नामाची मोहनी ॥२॥
 घन कांती फाकलीसे, निल अंगीचा झगा ।
मुकुटाचे तेज शोभे, किरणांना या बघा ॥३॥
अति जवळी येउनीया, हासतसे श्रीहरी ।
 तुकड्याचा भाव प्रेमे, उसळी घे श्रीहरी ॥४॥



·         मज वेडिया पहाताच, तुम्हा वेड लागु द्या ।
 बिघडा असेच भक्तिसी नि वृत्ति जागु द्या ॥धृ॥
हे ऎकता जसे मनी तसेच राहु द्या ।
 मग वागुनी जनी, वनी, जिवासि रंगु द्या ॥१॥
 मजहुनि अधीक थोर थोर, जन्म पावु द्या ।
 जरि आज भासती तरी, अधीक वाढु द्या ॥२॥
हरिभक्त होउ द्या नि पाप-मुक्त होउ द्या ।
मज लोपवोनि अधिक तेज, लोकि सेवु द्या ॥३॥
 तुकड्याचि आस येवढीच पूर्ण होउ द्या ।
 मिटवोनि द्रोह-बुध्दि, लोकि प्रेम वाहु द्या ॥४॥

·         मन चौर्‍यांशी फिरवीते हे । मन मोक्ष-सुखाला नेते हे ॥धृ॥
ऎक गड्या ! मन पवित्र कर हे, संतसमागम करुनीया ।
नाहि तरी जाशिल वाया, मन विषय-चिंतना देते हे ॥१॥
 सद्ग्रंथांचे पठन करी, अभ्यास करी मन स्थिरण्याला ।
चिंतावा मुरलीवाला, मन अनन्यभक्ती घेते हे ॥२॥
तुकड्यादास म्हणे ही वेळा, मिळते काय पुन्हा बापा ! ।
चुकवी चौर्‍यांशी खेपा, मन जे करशी ते देते हे ॥३॥

·         मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना ।
 जिव घाबरी अती भ्रमरा-परिस, बसेना ॥धृ॥
 'असशी कुठे तू हरी ?' ही चिंतना अती ।
 'कुणि भेटवील का ?' म्हणुनी भटकते मती ॥१॥
 काशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी ।
चारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी ।
 मनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ॥२॥
कुणि संत, साधुही वदती, जवळची हरी ।
 पहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी ।
 नच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ॥३॥
 ये भेटे सख्या ! पतितासी, रुक्मिणी-वरा !
तू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा !
 तुकड्याची आस ही पुरवी, देइ दर्शना ॥४॥

·     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।