.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

दिव्य संदेश- वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज .



                 दिव्य संदेश
    अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप भाई-बहनो! आपमे से हर व्यक्ति सुखी और उन्नत हो. हर देश सुरक्षित व समृध्द होकर रहे और संपूर्ण जगत्शान्तिपूर्ण तथा स्वर्गतुल्य बनेइसकी चिंता मै रातदीन करता आ रहा हु. इस ध्येयमुर्ती की पूजा मे मैने जीवनभर समस्त कार्योंके फूल ज़ोंके वाणीका एक एक शब्द अर्पित किया और मानसिक संकल्पो का निरंतर धूप जलाया. एक मेरिही बात नहीमेरा येह विश्वास है की संसार मे आजतक जो भी धर्मसंस्थापकपंथप्रवर्तकमतप्रचारक या महान राष्ट्रनिर्माता हो चुके है. उनके सामने यही विशाल तथा उंचा लक्ष्य था.और इसिके लिये उन्होंने अपनी चंदनसी काया को कण कण समाप्त कर दिया लेकिन उसकी फ़लशृती क्या?
     सज्जनो! यह न भुलिये की किसीदेश या दुनियांमे केवल दस पांच महापुरुष पैदा हो जाने से हि सवाल हल नही हो सकता. जबतक सभी पंथ- पक्ष - धर्म - सम्प्रदायो के अनुयायी अपने जीवन मे महान आत्माओंके विचारोंको निष्टपुर्वक नही उतारेंगे तबतक उनके दिव्य स्वप्न कदापी साकार न हो सकेंगे यह मानी हुइ बात है. अर्थात इसमे उन महात्माओंका तो कुच बिगडनेवाला नही है लेकिन विनाश होता रहेंगा तो हमाराही.
    मित्रो आज विघ्यान का प्रभाव हैजिसमे संसार के सारे देश बहुत निकट आ गये है. उनमे यदी भाई - चारा न बढे तो विश्वयुध्द में सबकी आहुंती पड सकती है. आज सारी दुनिया विनाशके ज्वालमुखी पर्वतपर बैठ विश्वशांती के नारे लगा रही है. मानव अपनी शक्ति के अदभूत अविष्कार देख बेफ़ाम हो चुका है. वह विघ्यन शक्तिका दुरुपयोग संहार के लिये कर रहा हैसेवा के लिये नही. परस्पर विश्वास और सहानुभूति खोकर सारी विश्वमानव आज अशांत और भयग्रस्त है.इस हाहा:कार का कारण यही है की मनुष्यकी बुध्दी का विकास हुआहृदय का नही. भौतिक प्रगतिसे विकारोंको बढावा मिलाविचारों को नही. जातिपक्षपंथधर्म भाषाप्रांतदेश आदि के संकुचित और कल्पित भेदोंको महत्व देकर मनुष्य आज एक दुसरेसे अलग हो चुका हैबल्कि शत्रू बन गया है. सही मायनेमें मनुष्य आज मनुष्यही नही रहा.और इसके बेइमानी के संकल्प निसर्गसे टकराकर संकटोके रूपमे उसीके पल्ले पड रहे है. क्या इस मार्गसे वह कभी खुश हो सकता है ?
        सज्जनो ! मानव समाज को यथार्थ मे सुखी बनाने और विग्यान के मानव जाती सेवामे लगानेका एकमात्र उपाय है - आध्यात्मिक अधिष्टानके सहारे मानवता का विकास ! अध्यात्मका अर्थ है सारे विश्व मे व्यापक सच्चिदानंद तत्व. उसिको मैं श्रीगुरुदेव नाम से संबोधित करता हूअ विभिन्न धर्म - पंथ - देशदिके सभी मानव उसी एक तत्व के प्रकट रूप है. - सुपुत्र है ! उन सबके लिये हमारे दिलमें समभाव,सहानुभूती तथा सक्रिया सेवावृत्ति पैदा हो और जीवनमे सत्यं शिवं सुन्दरम् जैसे जीवन मूल्योंकी प्रतिष्टापना होयही आध्यात्मका तकाजा है.
          भाईयो आध्यात्मिक संस्कारोकां का सबसे अच्छा विद्यापीठ है सामुदायीक ध्यान - प्रार्थना! जिसके द्वारा हम सब मानवोंमे समता व सामुदायीकता,सदभावना व सच्चरित्रता बढा सके ऐसी कोई भी सामुदायीक प्रार्थना आत्मोन्नति,राष्ट्रशक्ति तथा विश्वशांति की महान साधना बन सकती है. ग्रामजीवन का सर्वोदयराष्ट्रीय एकात्मता और विश्वमानवताका विकास सामुदायीक प्रार्थनासेही सहज संभव हो सकता है. मानव संस्कृति का पवित्र संविधान है सामुदायीक प्रार्थना! आजके सभी विकृत्तियोंको हटानेवाली दिव्योषधी और स्वर्गसम संसार इस नये विश्व का मंगलचरना है सामुदायीक प्रार्थना अपनी अपनी भाषा भुषारितीरस्मेंव्रतोपासनायेंचलने दिजीये हमारा कोइ ऐतराज नहीं. लेकीन मठ हो या मंदीरचर्च हो या मस्जिदवसाई हो या अग्यारीविहार हो या गुरुद्वारा हो या क्रीडांगन हर जगह सामुदायीक प्रार्थना और ध्यान अनुशासनपुर्वक किजीयेयहे मैं चाहता हुं. पाठ आप चाहे सो ले सकते है.या अपने अपने धर्म ग्रंथ के वचन भी गा सकते है लेकीन उनमे ऐसी व्यापक तथा सामुदायिक भावना आवश्य हो. सभी जाति पंथ के लोग मिलकर गांव - गांव इस तरह यदी महान संकल्पो को फ़ैलावेंगे तो उसिमेसे सामाजीक हृदय विकसित होने लगेगामनुष्यो के बीच भेदभावों की दीवार धडाधड गिरने लगेगी और नवचेतनाकी खुली बहती हवामे सत्ययुगके समान स्वर्गसम संसार साकार होने लगेगाऐसा मुज़े पूरा विश्वास है. जगच्चालक परमात्मा एकही है उसे चाहे जिस नामसे पुकारिये. किंतु अपनी प्रार्थना में यह यह सुत्र अवश्य रखीये कि -
                      सर्वे त्र सुखिन: सन्तुसर्वेसन्तु निरामया :
                      सर्वेभद्राणि पश्यंतुमा कश्चित् दु:ख माप्नुयात्

                                 तुकड्यादास


              दिव्य संदेश-वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज pdf स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी बटनावर क्लिक करा . 


  PDF डाऊनलोड करण्यासाठी  बटनावर क्लिक करा .एक नविन विंडो उघडेल त्यातील उजव्या कोपऱ्यातील  बाणाच्या चिन्हावर क्लिक करा .  PDF  डाऊनलोड होऊन जाईल . 
                                                                              -  जय गुरुदेव

 

तुकडोजी महाराज माहिती

तुकडोजी महाराज

Tukdoji Maharaj
मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रतुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत  म्हणून ओळखले जाते.  अंधश्रद्धा निर्मूलन,  जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रअमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रतुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा द्वारे केले जाते.ग्रामगीताहा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.
|| ग्रामगीता||
ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
साभार -https://amravati.gov.in/mr/

।।जय गुरुदेव।।