.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

शनिवार, १० जून, २०१७

ग्रामगीता - प्रस्तावना



ग्रामगीता - प्रस्तावना
       सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्या. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप म्हणजे 'ग्रामगीता '.

             
तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्राम कुटुंब, ग्रामप्रार्थना, ग्राममंदिरे, ग्रामसेवा, ग्रामसंस्कार, ग्रामउद्योग, ग्रामसंघटन, ग्रामआचार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार "ग्रामगीता' या ग्रंथात केला आहे.

                 
या ग्रामगीतेमध्ये एकेचाळीस अध्यायात आठ पंचके आहेत.  सद्‌धर्ममंथन, लोकवशीकरण, ग्रामनिर्माण, दृष्टिपरिवर्तन, संस्कारशोधन, प्रेमधर्मस्थापन, देवत्वसाधन, आणि आदर्श जीवन अशी ती आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत.

              
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे.
                         १९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला एकदोन नाही, तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा-या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. प्रस्तावना लिहिणा-यांत विनोबा, गाडगेमहाराज, मामासाहेब सोनोपंत दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत. तर वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते आणि ग. त्र्यं. माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत. शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं आहे.

                    
आपणा सर्वांसाठी ही 'ग्रामगीता' येथे सादर करीत आहोत, मुळ मराठी ओव्या व त्यांच्या इंग्रजी भाषांतरासहित.

साभार - khapre.org आणि  gramgeeta.org 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।