गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०
आरती राष्ट्रसंताची
आरती राष्ट्रसंताची
आरती राष्ट्रसंता, जगद्गुरु कृपावंता|
रोमरोमी विश्वचिंता, योगियाच्या महंता||धृ||
ध्वज तू कळसावरी, सर्वात्मक गुरुदेवा|
डोलले धर्म सारे, कैसी अपूर्व ती सेवा||१||
धावत्या पावलांनी, लाखों गावींच्या शिला|
चैतन्ये उठविल्या, धन्य तुझी दिव्य लीला||२||
पाषाण अस्त्र केले, धर्मा दिली नव-कांती|
कैवल्य माणिकाची, जिंकी काळासहि शांती||३||
गर्जली 'ग्रामगीता', वेधी विश्वचि खंजरी|
समुदाय जीवनाचा, स्वर्ग फुलाया भूवरी||४||
समन्वय महाज्योती, तुकडोजी ब्रम्हमूर्ती|
गुरुदास लीन पायी, द्यावी आपुली स्फूर्ती||५||
(रचियता- साहित्यरत्न सुदामदादा सावरकर)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
।।जय गुरुदेव।।
-
सामुदायिक प्रार्थना आदर्श पाठ ( प्रारम्भ मे दो मिनिट तक शान्ति से ' मौन - प्रार्थना ' कर...
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निवडक अभंग PDF स्वरुपात डाउनलोड करा . अ.क्र. शिर्षकावर क्लिक करून PDF डाउनलो...
-
आरती राष्ट्रसंताची आरती राष्ट्रसंता, जगद्गुरु कृपावंता| रोमरोमी विश्वचिंता, योगियाच्या महंता||ध...